थकबाकीदारांची नावे फ्लेक्‍सवर झळकणार

भिगवण – इंदापूर तालुक्‍यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या भिगवण ग्रामपंचायतीने थकित कर वसुलीसाठी आता चांगलीच कंबर कसली आहे. कर वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध पयार्याबरोबर मोठ्या थकबाकीदारांची नावे चौका- चौकात फ्लेक्‍सवर झळकणार आहेत.

वेळोवेळी कळवूनही कर भरण्यास थकबाकीदार टाळाटाळ करीत असल्याने ग्रामपंचायतीने ग्रामसभेत वसुलीसाठी थकबाकीदारांची नावे फ्लेक्‍सवर लावण्याचा ठराव मंजूर केला. त्यानंतर आता थकबाकीदारांची नावे फ्लेक्‍सवर लावण्यात
येणार आहे.

खातेदारांकडून जमा होणाऱ्या रकमेतूनच ग्रामपंचायतीतर्फे लोकांना आरोग्य, पाणी, वीज, स्वच्छता व इतर सोयीसुविधा पुरविण्यात येतात. त्यासाठी ग्रामपंचायतीकडून वेळोवेळी जनजागृतीबरोबरच घरोघरी जाऊन कराच्या रकमेची मागणी केली जात आहे. तरीही अनेक खातेदार कर भरण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे प्राथमिक सुविधा पुरविताना ग्रामपंचायतीला अडचणी येत आहेत. वेळोवेळी मागणी करूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याने आता आक्रमक पाऊल उचलले आहे. वषार्नुवर्ष ग्रामपंचायतीचा कर थकविणाऱ्या मोठ्या खातेदारांची यादी चौकात फ्लेक्‍सवर लावली जाणार असल्याचे कळताच थकबाकीदार कर भरू लागले आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here