अळकुटी, दि. 17 (वार्ताहर) -पारनेर तालुक्यातील पाबळ येथील कलाशिक्षक ज्ञानेश्वर कवडे यांनी आपल्या कुंचल्यातून टोकियो येथे पदक जिंकलेल्या भारतीय खेळाडूंची नावे श्री गणेशातून साकारले आहेत. यामध्ये सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा, रौप्यपदक विजेत्या मीराबाई चानू,लवलीना बोर्गेहन, बजरंग पुनिया, कांस्यपदक विजेता भारतीय हॉकी संघ इत्यादींचा समावेश केला आहे.
ज्ञानेश्वर कवडे हे पारनेर येथील न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज ऑफ सायन्स विद्यालयाचे कलाशिक्षक
असून यांचा फलक लेखनातही हातखंडा आहे. त्यांच्या सुलेखन कलेतून सातत्याने विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींच्या नावांचे अक्षर गणेश तयार केले आहेत.
आतापर्यंत हजारो अक्षर गणेश कलाकृती रेखाटली असून सोशल मीडियावर त्यांच्या कलेचा डंका वाजत आहे. त्यांच्या कलेचे कौतुक जिल्हा मराठाचे अध्यक्ष नंदकुमार झावरे पदाधिकारी व तालुका स्तरावरुन होत आहे.
अक्षर गणेश नाव रेखाटलेल्या भारतीय खेळाडूंनी आपल्या देशातील नव युवकांना व खेळाडूंना आपल्या खेळाने प्रभावित केले. सर्व खेळाडूंनी उत्तमरित्या खेळाचे प्रदर्शन करून त्यांच्या नावाने भारत देशाचे नाव उंचावल्याने त्यांना श्री गणेशातून अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत.
ज्ञानेश्वर कवडे,
कलाशिक्षक, पाबळ