सैफ आणि फातिमाच्या सिनेमाचे नाव बदलले

सैफ अली खान आणि “दंगल’गर्ल फातिमा सना शेख आगामी सिनेमात एकत्र असणार आहेत. या सिनेमाचे नाव आगोदर “तांत्रिक’ असे निश्‍चित झाले असल्याचे समजले होते. स्वतः सैफ अली खानने ही माहिती दिली होती. मात्र आता हा सिनेमा “भूत पॉलिश’ या नावाने ओळखला जाणार आहे, अशी ताजी बातमी समजती आहे. सिनेमाचे नाव बदलण्याचा निर्णय प्रॉडक्‍शन कंपनी फॉक्‍स स्टार स्टुडिओने घेतला आहे.

हे नाव बदलण्याचा निर्णय कंपनीने का घेतला आहे, हे मात्र समजू शकलेले नाही. ही एक हॉरर कॉमेडी असणार आहे आणि यामध्ये फातिमाचा रोल महत्वाचा असणार आहे. यामध्ये आगोदर अभिषेक बच्चन काम करणार होता. पण नंतर सैफ अलीची निवड या रोलसाठी केली गेली.

अजय देवगणची निर्मिती असलेल्या “तानाजी- द अनसंग हिरो’मध्येही सैफ एक महत्वाचा रोल करतो आहे. याशिवाय पूजा बेदीची मुलगी आलिया फर्निचरवालाचा सिनेमा “जवानी जानेमन’मध्येही तो असणार आहे. गेल्या वर्षी वेबसिरीज “सॅक्रीड गेम्स’मध्येही त्याचा महत्वाचा रोल होता. याच वेबसिरीजचा दुसरा भाग असलेल्या “सॅक्रिड गेम्स 2’मध्येही पुन्हा सैफ असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.