मुंबई – देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना अनेक दिग्गजांसह सेलिब्रिटींनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील लाल किल्यावरील आपल्या भाषणाची सुरुवात देशवासियांना शुभेच्छा देऊन केली. भारतीय क्रिकेट टीममधील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या पत्नीने पंतपधान मोदींकडे एक आगळीवेगळी मागणी केली आहे.
शमीची पत्नी हसीन जहाँने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तीन मुली ‘देस रंगीला’ या देशभक्तीपर गाण्यावर नृत्य करताना दिसत आहेत. हसीन जहाँने या व्हिडीओ पोस्टला दिलेले कॅप्शन मात्र लक्षवेधी ठरतंय. आपल्या कॅप्शनमध्ये हसीन जहाँ म्हणते,सर्वांना ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा, आय लव्ह भारत. आपल्या देशाचे नाव केवळ हिंदुस्थान किंवा भारत असायला हवे माननीय पंतप्रधान आणि माननीय गृहमंत्रीजींना विनंती आहे की,इंडिया नाव बदला जेणेकरून संपूर्ण जग आपल्याला भारत किंवा हिंदुस्थान म्हणेल,ना की इंडिया” अशा आशयाची पोस्ट हसीन जहाँने केली आहे.
View this post on Instagram
हसीन जहाँने नेमकं कोणत्या कारणामुळे अशी मागणी केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र हसीन जहाँच्या या मागणीमुळे नव्या चर्चांना जोरदार उधाण आले आहे. २०१४ मध्ये शमीसोबत विवाह केल्यानंतर हसीन जहाँने २०१८ मध्ये त्याच्यावर घरगुती हिंसाचारासारखे गंभीर आरोप केले होते.