नाईकांच्या वाड्यातील कहाणीचे रहस्य उलगडणार; अण्णा नाईक परत येणार..!

मुंबई – झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका महाराष्ट्रातील घराघरांत पहिली जाते. या मालिकेमध्ये अनेक रहस्यमय घटना समोर येत असतात. त्यामुळे ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका पाहण्याची उत्सुकता अधिकच वाढते. या मालिकेतील दत्ता, सुष्मा, अभिराम, छाया, दत्ता, वच्छी, पांडू, अण्णा नाईक, माई, शेवंता यांची रहस्यमय कहाणी नेहमीच प्रेक्षकांना खिळवून ठेवते.

दरम्यान, आता पुन्हा एकदा या रहस्यमय कहाणीचे आणखी एक पान उलगडण्याची वेळ आली आहे. स्मॉल स्क्रीनवर ज्या अण्णा नाईकांचा दरारा होता ते अण्णा नाईक आता परत येतायत. नाईकांच्या वाड्यातलं गूढ हे प्रत्येक वेळी प्रेक्षकांना खिळवून ठेवतं आणि आता अण्णा नाईकच परत येतायत म्हटल्यावर प्रेक्षकांसमोर नवा ट्विस्ट निर्माण होणार हे नक्कीच. रात्रीस खेळ चाले पार्ट २ मध्ये अण्णा नाईकांचा मृत्यू दाखवला होता. 

नुकतंच ‘रात्रीस खेळ चाले ३’ या मलिकेतचा ऑफिशल टिझर लॉन्च करण्यात असून, यामध्ये अण्णा नाईक दाखवण्यात येतायत. प्रेक्षकांना पुन्हा एकदा नाईकांचा वाडा, त्या वाड्यात घडणाऱ्या एकामागोमाग गूढ गोष्टी आणि खास करून शेवंता आणि अण्णा नाईक यांच्यातील लव्ह अँगल पाहण्यास मिळणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.