नांदेड – नांदेडमधील हॉटेल व्यावसायिकाच्या मृत्यूचे गुढ उलगडले असून मुलानेच त्याच्या वडिलाच्या काटा काढल्याचा धक्कादायक प्रकार चौकशीतून उघडकीस आला आहे. घरघुती वादातून ही हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. मुख्य आरोपी मुलासह इतर दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर सुपारी घेणारा आरोपी फरार आहे.
नांदेडमध्ये 1 सप्टेंबर रोजी हॉटेल व्यासायिक शेख युनूस शेख पाशा यांची राहत्या घरी हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत सहा दिवसात 3 आरोपींना ताब्यात घेतले. यात आरोपी मुलाचा देखील समावेश आहे. तर इतर दोन जणांनादेखील ताब्यात घेतले आहे.
दोन लाख रुपयांची सुपारी देऊन वडिलांचा काटा काढण्याचे षडयंत्र रचले. वडील आणि मुलामध्ये रोज छोट्या छोट्या गोष्टी वरून वाद होत होते. मुले वडिलांना समजावण्याचा प्रयत्न करत होते. मात्र वाद वाढत गेल्याने आरोपी मुलगा शेख अजमद शेख इसाक याने वडिलांची हत्या घडवून आणली. पोलिसांनी आरोपी शेख अजमद शेख इशाक याच्यासह इतर दोघांना ताब्यात घेतले आहे. सुपारी घेणारा आरोपी मात्र अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.