पाकिटमारांना विरोध करणे बेतले जिवावर

तरुणावर धारधार शस्त्राने वार केल्याने मृत्यू; स्वारगेट बसथांब्यावरील प्रकार

पुणे – स्वारगेट बसथांब्यावर गुरुवारी रात्री पाकिटमारांनी एका तरुणाचा खून केला. पाकिटमारांना विरोध करत असताना एकाने धारदार शस्त्राने तरुणाच्या मांडीवर वार केले. यानंतर रक्तस्त्राव झाल्याने संबंधीत तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी दोघांविरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

नागेश दगडू गुंड (37, रा. करुळ, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी कमलाकर शरनू घोडके (29, रा. पौड रस्ता, कोथरुड) यांनी फिर्याद दिली. फिर्यादी व मयत दोघेही वाहनचालक म्हणून काम करतात. मयत नागेश हा लॉकडाऊनमध्ये कुटुंबासह मूळगावी गेला होता. त्याला शुक्रवारी बावधन येथून नाशिकसाठी वाहतुकीची वर्दी मिळाली होती. यामुळे तो गुरुवारी रात्री घरून पुण्याला येण्यासाठी निघाला होता.

त्याने गुरुवारी रात्री सव्वाअकरा वाजता फिर्यादीला फोन करून “स्वारगेट बसथांब्यावर थांबलो असल्याचे सांगत तेथे न्यायला ये’ असा निरोप दिला. त्याप्रमाणे फिर्यादी दुचाकी घेऊन तेथे आला. तेथे फिर्यादीला बसथांब्यावरील खुर्चीवर त्याची पिशवी व बॅग दिसली. मात्र, नागेश कुठेच दिसला नाही, यामुळे त्याने नागेशला फोन लावला असता तो उचलून लगेचच कट केला. यानंतर परत फोन लावला असता, तो बंद होता. फिर्यादी गाडी वळवून परत जायच्या तयारीत असतानाच त्याला नागेशने आवाज दिला.

फिर्यादी नागेशच्या आवाजाच्या दिशेने गेला असता तेथे तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. फिर्यादीने नागेशला काय झाले विचारले असता, दोन तरुण माझ्या खिशातील मोबाइल आणि पैसे हिसकावत होते. मी त्यांना विरोध केला असता त्यातील एकाने धारदार वस्तूने मांडीवर मारून माझा मोबाइल व पैसे चोरुन नेल्याचे सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.