– सुनील राऊत
पुणे : शहरात कोरोनाचे 2 रुग्ण सापडल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने अवघ्या काही तासात 200 खाटांचे तात्पुरते रुग्णालय 2 इमारतीत सुरू केले आहे. या ठिकाणी कोरोनाची लागण झालेल्या 2 रुग्णाच्या संपर्कात आलेल्या इतर नागरिकांचे विलगीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी डॉक्टरांचे पथक आणि इतर यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. पुढील काही तासात ही रुग्णालये सुरू केली जाणार आहेत. त्यात राजयोग सोसायटी मधील राजयोग दवाखाना आणि सणस मैदानातील इमारतीचा समावेश आहे.
त्या 40 जणांचा शोध सुरू
दरम्यान, या 2 रुग्णासोबत सुमारे 40 जणांचा ग्रुप दुबईला सहलीसाठी गेला होता. एका खासगी टूर्सच्या माध्यमातून हे गेले होते. त्याची माहिती संकलित करण्यात आली असून त्या सर्वांना या दोन रुग्णालयात देखरेखेखाली ठेवण्यात येणार आहे.