बहुचर्चित सिनेमा “सूर्यवंशी’ आणि “अंतिम’ दिवाळीमध्ये होणार रिलीज

देशभरातील करोना रुग्णांची संख्या घटल्यामुळे आता हळूहळू सगळे निर्बंध हटवले जाऊ लागले आहेत. आता 22 ऑक्‍टोबरपासून सर्व थिएटर आणि चित्रपटगृहे उघडली जाणार आहेत.

त्यामुळे एकापाठोपाठ एक करत सगळे सिनेमा थिएटरमध्ये रिलीज केले जायला लागले आहेत. आता “सूर्यवंशी’ आणि “अंतिम’ हे दोन सिनेमे सर्वात

आगोदर थिएटरमध्ये रिलीज होण्याची शक्‍यता आहे. अक्षय कुमारचा “बेल बॉटम’ हा करोना काळातच थिएटरमध्ये रिलीज झालेला पहिला सिनेमा होता.

या सिनेमात वाणी कपूर, लारा दत्ता आणि हुमा कुरेशी या देखील होत्या. हा सिनेमा रिलीज होण्याच्या वेळीच करोनाची साथ वाढली होती. त्यामुळे “बेल बॉटम’चा रिलीज पुढे ढकलला गेला होता. 

याच दरम्यान ‘सूर्यवंशी’ देखील रिलीज होणार होता. तो देखील पुढे ढकलला गेला. नाही तर 15 ऑगस्टला “बेल बॉटम’ आणि “सूर्यवंशी’ या दोन्ही सिनेमांची टक्कर झाली असती.

मात्र, आता या सिनेमाच्या बरोबरच “सूर्यवंशी’ आणि “अंतिम’देखील रिलीज होण्याची शक्‍यता आहे. या दरम्यानच्या काळात जर पुन्हा एकदा करोनाची तिसरी लाट आली तर हे तिन्ही सिनेमे पुढे ढकलले जाऊ शकतील.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.