अमिताभ बच्चन यांच्या सुपरहिट “आखे’चा सिक्वल खूप दिवसांपासून रखडला होता. “आंखे’च्या निर्मात्यांनी अनेक वेळा हा पिक्चर पूर्ण करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
काही दिवसांपूर्वीच “आंखे 2’च्या प्रॉडक्शनची घोषणा झाली होती. मात्र, आता “आंखे 2’चे प्रॉडक्शन पूर्णपणे थांबवण्यात आले आहे.
“आंखे 2’मध्ये अमिताभ बच्चन, सिद्धार्थ मल्होत्रा आणि अक्षय खन्ना हे लीड रोलमध्ये असणार होते. मात्र हा पिक्चर आता का गुंडाळला गेला आहे, हे मात्र समजू शकलेले नाही.
यावर्षी जून महिन्यापर्यंत पिक्चरचे शूटिंग सुरू करायचे नियोजन होते. मात्र तसे होऊ शकले नाही. अखेर सुरू होण्यापूर्वीच हा पिक्चर गुंडाळावा लागला आहे. मात्र, अद्याप त्याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.