महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून स्पष्ट
पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) येत्या 11 ऑक्टोबरला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा नियोजित वेळेत होणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, या परीक्षेचा निकाल मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले.
“एमपीएससी’ परीक्षा घेण्याचा प्रयत्न केल्यास एकाही परीक्षा केंद्रावर परीक्षा होऊ दिली जाणार नसल्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.
परीक्षेसाठी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून उमेदवारांचे अर्ज स्वीकारले आहेत. प्रवेश प्रमाणपत्रेही देण्यात आली आहेत. ही परीक्षा नियोजित वेळेत होणार असल्याचे “एमपीएससी’चे सचिव सुनील अवताडे यांनी नमूद केले.