पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगच्या (एमपीएससी) माध्यमातून घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपात्रित गट-ब पूर्व परीक्षेची तारीख घोषित करण्यात आली असून दि. 8 ऑक्टोबरला परीक्षा घेतली जाणार आहे. यासाठी 15 जुलै पर्यंत उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे. आहे. एकूण 800 पदांकरिता ही भरती होणार आहे.
या परीक्षेच्या माध्यमातून सहाय्यक कक्ष अधिकारी- 42 पदे, राज्य कर निरीक्षक – 77 पदे, पोलिस उपनिरीक्षक – 603 पदे, दुय्यम निंबधक/मुद्रांक निरीक्षक – 78 पदे भरली जाणार आहे. पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरता डिसेंबर 2022 किंवा त्यानंतर आयोजित होण्याची शक्यता आहे.
संबंधित परीक्षेच्या जाहिरातीत विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीद्वारे अर्ज मागवण्यात आले आहेत. संर्वगातील पदसंख्या व आरक्षात शासनाच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे.