पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (२०२४) प्रेक्षकांची पसंतीची पोच पावती मिळावणाऱ्या ‘स्थळ’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटाने जगभरातील अनेक फिल्म फेस्टीवल्सची वारी केली असून विविध पुरस्कारांवर आपल्या नावाची मोहर उमटवली आहे. आता स्थळ थिएटर्समध्ये रिलीजसाठी सज्ज झाला असून सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
हा सिनेमा स्त्री सशक्तीकरणावर भाष्य करणारा सिनेमा आहे. सिनेमाची कथा विदर्भात येणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील डोंगरगाव येथे घडताना दाखवण्यात आली आहे. सिनेमातील पात्र साकारणारे कलाकार हे देखील नवखे आहेत. हा सिनेमा मराठी सिनेसृष्टीतील जेष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी प्रस्तुत केला आहे. सिनेमातील मुख्य पात्राचे नाव सविता दौलतराव वांढरे असून तिच्या लग्नासाठी कुटुंबीयांवर कायकाय करण्याचे वेळ येते. तसेच या सर्व गोष्टींना सिनेमातील हे मुख्य पात्र कसे उत्तर दिते, हे या सिनेमात दाखवण्यात आले आहे.
या सिनेमाची निर्मिती धून प्रोक्डक्शनने केली असून, या सिनेमाची कथा आणि दिग्दर्शन जयंत दिगंबर सोमलकर यांनी केले आहे. स्थळ ७ मार्च म्हणजेच महिला दिनी रिलीज होणार आहे. या सिनेमाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता पाहिला मिळत आहे.