मुंबई – बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण स्टारर ‘पठाण’ सिनेमा आज जगभरात प्रदर्शित झाला. गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या पठाण सिनेमानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता शाहरुख खान याने 4 वर्षांनंतर पुनरागमन केले आहे.
‘पठाण’ने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये ज्याप्रकारे रेकॉर्ड केले आहेत, त्याच प्रमाणे पहिल्या दिवशी दुपारी 3 वाजेपर्यंत 19.67 कोटी रुपये जमा केले आहेत. सिनेमाने पीव्हीआरमध्ये 9.40 कोटी, आयनॉक्समध्ये 7.05 कोटी, सिनेपोलिसमध्ये 3.90 कोटींची दमदार कमाई केली आहे.
वीकेंडपर्यंत हा सिनेमा 200 कोटींचा गल्ला जमवेल अशी अपेक्षा आहे. अॅडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत सुद्धा सिनेमाने धुमाकूळ घातला आहे. या सिनेमात अभिनेता शाहरुख खान सोबत अभिनेत्री दीपिका पदुकोण, अभिनेता जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत आहेत.