वाचकांकडून “ई-बुक्‍स’ची चलती

पुस्तक दिनाला मिळाला “ऑनलाइन’चा आधार

पुणे – लॉकडाऊनच्या काळात पुस्तक वाचनासाठी “ऑनलाइन’चा आधार घेत “ई-बुक्‍स’वाचले जात असल्याचे चित्र जागतिक पुस्तक दिनानिमित्त (23 एप्रिल) घरांमध्ये पाहायला मिळाले. या पुस्तकप्रेमींकडून यंदाचा पुस्तक दिन सोशल मीडियावर साजरा करण्यात आला.

दरवर्षी 23 एप्रिल रोजी जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिन जगभर साजरा करण्यात येतो. वाचन, प्रकाशन आणि कॉपीराईटविषयी कायद्याची नागरिकांना जाणीव व्हावी, या हेतूने युनेस्कोने या दिनाची घोषणा 23 एप्रिल 1995 मध्य केली. गेली 25 वर्षे हा दिन साजरा करण्यात येतो.

महाराष्ट्राला साहित्य संस्कृतीची मोठी परंपरा आहे. मराठी भाषेत दरवर्षी सुमारे 5 हजारांहून अधिक पुस्तके प्रकाशित करण्यात येतात. प्रकाशक देखील दरवर्षी विविध योजनांतर्गत विविध लेखनकृती वाचकांपर्यंत पोहोचवत आहेत. परंतु, सध्याच्या बदलत्या काळात पुस्तकांचा वाचकवर्ग कमी झाला असल्याची चर्चा अनेकदा होत असली, तरी देखील आजही पुस्तके वाचकांच्या मनावर अधिराज्य करत असल्याचे चित्र आहे.

जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने यंदा नेटीझन्सने वाचलेल्या पुस्तके, आवडत्या लेखकांची पुस्तके, दुर्मिळ पुस्तके आदींचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.