पूर्व लडाखमध्ये चीनच्या ड्रोनच्या हालचाली वाढल्या

नवी दिल्ली  – पूर्व लडाखजवळ बारताच्या सीमेजवळ चीनने तब्बल 50 हजार सैनिक तैनात केले आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चीनच्या ड्रोनच्या होलचालीही वाढल्या आहेत. ही ड्रोन भारतीय सीमारेषेजवळ उडत असल्याचे दिसून आले आहे. 

दुरांत बेग ओल्डी, गोग्रा हाईटस आणि अन्य महत्वाच्या भागात चीनची ही ड्रोन आढळून आली आहेत. बारतीय सुरक्षा दलांकडून या बागात विविध आधुनिक उपकरणांद्वारे नेहमीच लक्ष ठेवले जात असते. या देखरेखीदरम्यानच चीनची ही ड्रोन आढळून आली आहेत, असे सरकारी सूत्रांनी वृत्तसंस्थेला सांगितले. चीनच्या ड्रोनच्या होलचालींवर बारीक लक्ष ठेवले जात असल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले.

भारतीय सुरक्षा दलांकडूनही ड्रोनचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो आहे. त्यामध्ये लवकरच इस्रायली आणि भारतीय बनावटीच्या आधुनिक ड्रोनचीही भर पडणार आहे. चीनच्या सीमेवरील आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी आपत्कालिन तरतूदींतर्गत या ड्रोनची खरेदी केली जात आहे. तणाव असलेल्या क्षेत्रांवर चीनच्या कुरापतखोरीमुळे गेल्यावर्षी एप्रिल-मे महिन्यात निर्माण झालेला तणाव आता कमी होणे गरजेचे आहे, असेही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

दोन्ही देसांदरम्यान चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. त्यानुसार पॅन्गॉंग त्सो आणि गोग्रा हाईटस या भागातील दोन्ही देशांचे सैन्य मागे हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.