आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या नात्याची सर्वत्र चर्चा होत आहे. तिच्या घरच्यांना रणबीर आणि आलिया विषयी प्रश्न विचारले जात आहे. काही दिवसाआधी सोनी राजदान यांना आलिया-रणबीर विषयी काही प्रश्न विचारण्यात आले होते. आता तिची बहिण पूजा भट्ट हिला देखील त्यांच्या नात्यविषयी प्रश्न विचारण्यात आले. ती म्हणाली तिला आधीच आईने सल्ला दिला आहे. यावर मी तिला काही सल्ला देणार नाही. आलियाला तिचे आयुष्य जगण्याचा पूर्ण अधिकार त्यामुळे तिला तिच्या लग्नाविषयी निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. मी एवढ सांगेन की, तिने योग्य निर्णय घ्यावा..असा सल्ला बहिण पूजाने तिला दिला.
सोनी राजदानने म्हटले की, मी काही बोलले की ट्रोल होते. मला देशद्रोही म्हटले जाते. कधी-कधी वाटते की मला पाकिस्तान निघून जायला हवे. मी तिथे अधिक आनंदात राहीन. तेथील जेवण देखील खूप छान आहे. आपण लोकांनीच मला ट्रोल करून म्हटले की पाकिस्तानला जा, म्हणून पाकिस्तानात जाईन. मी स्वत:च्या इच्छेने पाकिस्तानात सुट्टी घालवीन.’ असे नमूद करत सोनी म्हणाली की तिच्यावर ट्रोलर्सद्वारे पाकिस्तान पाठवण्याच्या कमेंट्सचा अधिक प्रभाव पडलेला नाही. मी भारताला पूर्णपणे हिंदू देश बनवण्याच्या विरोधात आ हे. पाकिस्तानमध्ये मिश्रित संस्कृती नाही म्हणून तो चांगला देश बनू शकला नाही.’ असेही सोनी राजदान म्हणाली. तिच्या या कॉमेंटवरून पल्लवी जोशीने ज्यांना भारतात सुरक्षित वाटत नाही, त्यांनी खुशाल पाकिस्तानात जावे, असे म्हटल्याने हा वाद आणखीन वाढण्याची शक्यता अहे. पूजाने आलियाच्या लग्नाबाबत न बोलण्यासाठी आई सोनी राजदानचेच कारण पुढे केले आहे. त्यामुळे नक्की बोलायचे तरी कशाबाबत असा प्रश्न पडू शकतो.