‘आतापर्यंतचे सर्वात अवैज्ञानिक सरकार’; देशातील कोरोना परिस्थितीवरून असदुद्दीन ओवैसी आक्रमक

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा विस्फोट होत आहे. रोज ४ लाखाच्या पुढे कोरोनाबाधितांचा आकडा जात आहे. त्यातच एआयएमआयएमी चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. देशाच्या इतिहासातील मोदी सरकार हे आजपर्यंतचे बेजबाबदार आणि अवैज्ञानिक सरकार असल्याची टीका यावेळी ओवैसी यांनी केली आहे.

देशातीळ कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुले आरोग्य वयवस्थेवर मोठ्या प्रमाणात ताण निर्माण झाला आहे. त्यात रुग्णांचे हाल होताना दिसत आहेत. या सर्व परिस्थितीवर ओवैसी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच सरकारच्या धोरणांवर टीका करत आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी यावेळी, देशात ज्यावेळी कोरोनाची पहिली लाट ओसरली त्यावेळी केंद्र सरकारने स्वतःलाच शाबासकी देत स्वतः ची पाठ थोपवून घेतली. त्यानंतर सध्या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे त्यावर एकही शब्द बोलायला सरकार तयार नसल्याचेही त्यांनी म्हटले.

दरम्यान, काही दिसावापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने कोविड टास्क फोर्स तयार करण्याचे निर्देश दिले होते. यावरून टीका करत ओवैसी यांनी म्हटले. सरकारने देशात दुसरी लाट येणार असा विचार करून जर उपाययोजना केल्या असत्या तर आज देशावर ही वेळ आली नसती. सरकारचे हे वागणे म्हणजे पूणर्पणे बेजबाबदार असल्याचेही त्यांनी म्हटले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.