मुंबई – नुसरत जहाँ अतिशय सुंदर आणि ग्लॅमरस अभिनेत्री आणि खासदार आहे. नुसरत यांनी बंगाली सिनेसृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. 8 जानेवारी 1990 ला त्यांचा जन्म कोलकत्यात झाला.
2019 मध्ये त्यांनी सक्रीय राजकारणात प्रवेश केला आणि तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार म्हणून बशीरहाट लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्या. नुसरत जहाँ सोशल मीडियावर अतिशय सक्रिय असतात.
सोशल मीडियाच्या माध्यमातून नुसरत सतत आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. नुकतंच अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहाँ यांनी आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर काही ग्लॅमर्स आणि घायाळ करणारे फोटो शेअर केले आहेत. त्यांच्या दिलखेच फोटोंवर चाहत्यांनी अक्षरशः कमेंट आणि लाईक्स चा पाऊस पडला आहे.
नुसरत जहाँ यांनी 2011 मध्ये राज चक्रवर्ती यांच्या चित्रपटातून पदार्पण केले होते. 2019 मध्ये उद्योगपती निखिल जैन यांच्याबरोबर त्यांनी विवाह केला. सध्या नुसरत जहाँ कोलकत्याच्या राजकारणात अतिशय सक्रिय आहेत.