हॉंगकॉंगमध्ये सर्वात महागडे घर

घराच्या किमती आता सामान्यांच्या आवाक्‍यात राहिल्या नाहीत. मेट्रो शहरातील घर खरेदी करणे म्हणजे आता दिवास्वप्नच ठरू लागले आहे. कारण कधीकाळी लाखात मिळणारे घर आता कोटीत गेले आहे. ही परिस्थिती दिल्ली, मुंबई, पुणे शहराचीच नाही तर अन्य प्रमुख महानगरातही होत आहे. असे असतानाही जागतिक स्तरावर घराच्या किमतीचा विचार केल्यास भारतातील शहरे अजूनही मागेच असल्याचे दिसून येते.

एका अहवालानुसार हॉंगकॉंगमध्ये जगातील सर्वात महागडे घर असण्याची परंपरा अद्याप कायम राहिली आहे. जगातील कोणत्याही शहरापेक्षा हॉंगकॉंग शहरातील निवासी घराचे किमान मूल्य 8.30 कोटी इतके आहे. त्याचबरोबर प्राइम पॉपर्टी (आलिशान)च्या किमतीतही हॉंगकॉंग सर्वांत पुढे असून त्याची किंमत 4,775 कोटी रुपये इतकी आहे. या तुलनेत ग्रेटर मुंबईत 500 चौरस फुटाचा बिल्टअप एरियाचा वन बीएचके फ्लॅटची किंमत 1 कोटी ते 1.10 कोटी इतकी आहे तर अहमदाबादमध्ये त्याच आकाराचा फ्लॅट 30 लाखांपर्यंत मिळतो. ही आकडेवारी सीबीआरई ग्रुप इंकच्या ग्लोबल लिव्हिंग रिपोर्टमध्ये दिली आहे. त्यात बार्सिलोनापासून बर्मिगहॅंमपर्यतच्या 35 प्रमुख शहरातील आकडेवारींचा समावेश आहे.
काही महानगरात निवासी मूल्यात घसरण झाली आहे. अहवालानुसार गेल्यावर्षी सर्वात चांगली कामगिरी न्यूयॉर्क, लॉस एंजलिस, टोरॅंटो, व्हॅंक्‍यूअर, सिडनी आणि मेलबर्न शहराची राहिली आहे. अर्थात, तेथील बाजारात निवासी घराच्या किंमतीत घसरण झाल्याने त्यांचे यादीतील स्थान घसरले आहे. या आधारावर युरोपातील शहरे स्थान टिकवून आहेत. त्याठिकाणी किमती अजूनही आकाशाला भिडलेल्या आहेत.

या यादीत भारतातील एकही शहर नाही. अर्थात, काही महानगरातील स्थितीत बदल झाला आहे. या यादीत हॉंगकॉंगनंतर सिंगापूर आणि शांघायचा नंबर लागतो. व्हॅंक्‍यूअर तसेच चीनचे महानगर शन्जेन येथे घरांचे निवासी दर उच्च पातळीवर आहेत. ते किमतीच्या क्रमवारीत पहिल्या पाचमध्ये आहेत.

हॉंगकॉंगमध्ये गेल्यावर्षी 17,790 घरांची पूर्तता झाली होती. परंतु शहराचा कमी आकार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता हा पुरवठा कमी असल्याचे अहवालात म्हटले आहे. प्राइम होम्सच्या मागणीत जगातील सर्वात महागड्या शहरात शांघाय तसेच मॉस्कोचा नंबर लागतो. तेथे घरांची किंमत 16 कोटी 68 लाख, बीजिंगमध्ये 15 कोटी 30 लाख, शेन्जेनमध्ये 14 कोटी आणि लंडनमध्ये 12 कोटी 50 लाख रुपये इतकी आहे. या यादीत स्वस्त प्राइम होमचा शोध घेणाऱ्यांसाठी डबलिन उपयुक्‍त आहे. तेथे घराचे सरासरी मूल्य 2 कोटी 66 लाख इतके आहे. त्याचबरोबर हो ची मिन्ह येथे 2 कोटी 80 लाख रुपये किमतीची घरे उपलब्ध आहेत. तुलनेने ही घर वाजवी किंमतीची मानली जातात.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.