मुंबई – बॉलिवूड मध्ये अनेक चित्रपट प्रदर्शित होत असतात पण काही चित्रपट असे असतात ज्याची लाखो चाहते वाट पाहात असतात. नुकताच बॉलिवूडचा दंबग खान सलमानचा ‘दबंग ३’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दबंग सिरिजमधील हा चित्रपट आहे. या चित्रपटात सलमानसह सोनाक्षी सिन्हा, सई मांजरेकर, अरबाज खान, सुदीप किच्चा हे कलाकार आहेत.
दरम्यान, ‘दबंग ३’चा कोस्टार अभिनेता सुदीप किच्चाला सलमानने एकदम खास अशी भेटवस्तू दिली आहे. सुदिपने या भेटवस्तूचा फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला असून, सलमानचे आभार मानले आहेत.
या फोटोमध्ये सुदिपने शानदार असे लेदर जॅकेट परिधान केले आहे. या जॅकेटच्या पाठीमागे सलमानच्या (नियपोलिटन मास्टिफ़ ब्रीड) डॉगचे चित्र आहे. सलमान त्याला प्रेमाने मिठी मारताना दिसत आहे. सलमनानकडे दोन डॉग असून, त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे.
सुदीप म्हणाला कि, “मला हे जॅकेट घालताना सलमान सर म्हणाले की मी कधीच विचार केला नव्हता की मी या जॅकेटपासून दूर जाईन… हा फोटो शेअर करत त्याने कॅप्शन दिले आहे. सलमानने या जॅकेटवर त्याच्या आवडत्या पाळीव प्राण्याचे चित्र काढून घेतले होते. ज्या गोष्टींच्या आपण फार जवळ असतो त्या गोष्टींचे महत्त्व मला माहित आहे”. असे सुदीप म्हणाला आहे.