बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नाडिजने स्वत:चा फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले की, “सिनेमा. जगातील सर्वात सुंदर फसवणूक.. आत पहा.’ या फोटोमध्ये अभिनेत्रीने एका चमकदार टॉप परिधान केलेला आहे आणि आपले केस मोकळे सोडलेले आहेत. ती खूपच कमी मेकअप आणि गुलाबी लिप कलरमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. जॅकलिनने अलीकडेच एका पोस्टमध्ये कोविड-19 या महामारीने मला जीवनाचे महत्त्व शिकवले आहे आणि जीवनाचा प्रत्येक दिवस मौल्यवान आहे, असे सांगितले होते.
आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत जॅकलिन म्हणाली, या साथीच्या आजारामुळे मला असे वाटते की आयुष्य खूपच लहान आहे. आपल्याला प्रत्येक दिवसाचे मूल्य समजून घेणे आवश्यक आहे आणि चांगले जगणे आवश्यक आहे. तसेच निसर्ग आणि आपल्या जीवसृष्टीबद्दल कृतज्ञता बाळगण्याची गरज आहे.
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास, जॅकलिनने नुकतेच “मिसेस सीरियल किलर’ या वेब सीरिजमधून डिजिटल डेब्यू केले आहे. तसेच तिने “होम डान्सर’ ही ऑनलाईन डान्स स्पर्धासुद्धा सुरू केली आहे. याशिवाय जॅकलिन सुपरस्टार सलमान खानच्या “तेरे बीना’ या गाण्यातही झळकली होती. आता ती जॉन अब्राहमसोबत “अटॅक’ चित्रपटात झळकणार आहे.