नवी दिल्ली – भारतीय हवामान विभागाने मंगळवारी बंगळुरूच्या शहरी आणि ग्रामीण भागासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागात पुढील 4-5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
देशाच्या दक्षिण भागात बेंगळुरू, माडीकेरी, चिकमगलूर, वायनाड, कोवलम आणि दक्षिण भारतातील इतर अनेक शहरांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. केरळ,तामिळनाडू, कर्नाटक, लक्षद्वीप आणि रायलसीमा येथे पुढील पाच दिवसांत गडगडाटी वादळासह, विजांच्या कडकडाटासह हलका/मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मंगळवारी रात्री उशिरापर्यंत, तेलंगणाच्या काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला होता. दरम्यान मान्सुनने अंदमान निकोबार बेटे व्यापली असून तो अंदमान समुद्रात आणखी पुढे सरकारला आहे अशी माहितीही हवामान खात्याने दिली आहे.