सौंदर्या शर्माच्या रूममध्ये माकड घुसले

सौंदर्या शर्माने मध्यंतरी एक मजेदार व्हिडीओ शेअर केला होता. त्यामध्ये एक माकड फळे खाताना दिसले होते. या व्हिडीओला सौंदर्याने मजेशीर कॅप्शनही दिली आहे. “ठग लाईफ…सकाळी सकाळी माझ्या खोलीमध्ये घुसलेले माकड. सकाळचा नाश्‍ता केल्याशिवाय जायला नकार दिला. नाश्‍ता केल्यावर माझ्या बिस्तरवर त्याने मस्तपैकी आराम केला आणि झोप काढली. त्यावेळी मी फक्‍त ओरडत होते आणि रेकॉर्डिंग करत होते. कारण मी तेवढेच करू शकत होते.’ असे या माकडाच्या भेटीचे वर्णन सौंदर्याने केले आहे.

सौंदर्याचा अखेरचा 2017 साली “रांची डायरीज’ हा सिनेमा आला होता. पण त्यानेही विशेष यश मिळवले नव्हते. त्यामध्ये सौंदर्याबरोबर अनुपम खेर, हिमांश कोहली, जिमी शेरगिल आणि सतिश कौशिक हे पण होते. तो तिचा आतापर्यंतचा पहिला आणि एकमेव सिनेमा आहे. आता तिने आपला मोर्च हॉलिवूडकडे वळवला आहे. अमेरिकेतल्या “वंडर वुमन’ या सिनेमासाठी तिने ऑडिशन दिली आहे. तिला तिकडे बॉलिवूडपेक्षा जास्त स्कोप वाटतो आहे. पण तिच्या खोलीमध्ये माकड आले कोठून हे समजलेच नाही.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.