मुंबई – र्यावरण मंत्री आदित्य ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. येत्या १० जून रोजी आदित्य ठाकरे प्रभू रामचंद्राचं दर्शन घेणार आहे. अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज ट्विटरद्वारे दिली.
अयोध्या..
10 जुन!
अदित्य ठाकरे जी के नेतृत्वमे.
जय श्रीराम! pic.twitter.com/aYWU1YRaqq— Sanjay Raut (@rautsanjay61) May 8, 2022
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा ट्विट करत आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची सविस्तर माहिती दिली आहे. १० जून रोजी अयोध्येत श्रीरामाचे दर्शन घेतील. त्यानंतर संध्याकाळी शरयू नदीच्या तीरावर महाआरती करतील.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याआधी अयोध्येत शिवसेनेकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे. या पोस्टरबाजीतून शिवसेनेने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘असली येत आहे, नकली पासून सावधान’, अशा शब्दांमध्ये शिवसेनेने पोस्टरच्या माध्यमातून राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.