नवी दिल्ली – निर्गुंतवणूकीचे लक्ष्य गाठण्यासाठी केंद्र सरकारने स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया (SAIL)मधील पाच टक्क्यांची भागीदारी विकण्याच्या तयारीत आहे. यातून सरकारला १ हजार कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. सेलमध्ये सरकारची भागीदारी ७५ टक्के आहे.
सेलमधील भागीदारीची विक्री ऑफर फॉर सेल (OFS) या प्रक्रियेमधून करण्यात येणार आहे. या प्रक्रियेमधून सरकारी कंपन्या आपली भागीदारी थेट गुंतवणूकदारांना विकतात. यामध्ये पारदर्शकतेचाही विशेष काळजी घेण्यात येते.
दरम्यान, यंदाच्या वर्षी सरकारने १.०५ लाख निर्गुंतवणूकीचे लक्ष्य ठेवले आहे. यानुसार केंद्र सरकार देशातील दुसरी सर्वात मोठी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL)चेही खासगीकरण करण्यात येणार आहे. तर अर्थसंकल्पात एलआयसी आणि एचडीएफसीमधीलही भागविक्री करण्यात येणार आहे.