मोदी सरकार आले अन्‌ त्याने गावाला घातला दंडवत

संगमनेर – राज्यात निवडणुकांच्या रणधुमाळीत जो पर्यंत मोदी सरकार केंद्रातून जात नाही, तो पर्यंत शर्ट न घालण्याचीएकाने राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात शपथ घेतली होती. या प्रकाराची चर्चा संपते न संपते तोच आता नरेंद्र मोदींचे सरकार पुन्हा बहुमताने केंद्रात आल्याने आनंदपूर्ती म्हणून संगमनेर खुर्द येथील भगवान ठकाजी येरमल यांनी वेगळाच उपक्रम राबविला. त्यांनी छातीवर छप्पन इंच, तसेच नमो-नमो, मै हू चौकीदार असं, पाठीवर लिहून संपूर्ण गावाला दंडवत घालून अभिवादन केले आहे. येरमल यांच्या मोदी प्रेमाची त्यांमुळे चांगलीच चर्चा रंगली.

नगर जिल्ह्यातील कॉंग्रेसचे मात्तबर नेते बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर मतदारसंघातील संगमनेर खुर्द येथील भगवान ठकाजी येरमल (वय-34) हा युवक शेतमजुरी करुन आपली गुजराण करतो. 2014 च्या मोदी फिव्हरमध्येही त्याने मोदींच्या विचारांनी प्रभावित होऊन भाजपचा प्रचार केला.

यंदाच्या निवडणुकीतही त्याने पुन्हा मोदींची सत्ता येण्यासाठी प्रचार केला. आता केंद्रात एनडीएची सत्ता आल्याने त्याचा आनंद उत्सव आणि नवसपूर्ती म्हणून गावातील दक्षिणमुखी मारुती मंदिर ते शीतला माता मंदिरादरम्यान संपूर्ण गावामध्ये दंडवत घालून अभिवादन केले. मोदी सरकारच्या काळात त्याने कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नाही. मात्र त्याच्या नातेवाईकांना त्याचा लाभ झाल्याचे पाहून तो प्रभावित झाल्याचे त्याने सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)