मोदींवर आधारित वेब सीरिजही थांबवली – निवडणूक आयोगाचे आदेश

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ सिनेमानंतर आता निवडणूक आयोगाने नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित बेव सीरिजवरचे प्रदर्शन थांबवले आहे. “मोदी जर्नी ऑफ कॉमन मॅन’ या वेब सीरिजचे स्ट्रीमिंग थांबवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

या वेब सीरिजचे सर्व एपिसोड्‌सच्या स्ट्रीमिंगचे सर्व ऑनलाईन माध्यामावर बंद करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने इरॉस नाऊला दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित या वेब सीरिजचे पाच एपिसोड स्ट्रीम झाले आहेत.

निवडणुकीच्या काळात ही वेब सीरिज स्ट्रीम करण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता. आम्ही गेल्या 11 महिन्यांपासून या वेब सीरिजवर काम करत आहोत. मात्र तांत्रिक अडचणींमुळे ही वेब सीरिज स्ट्रीम होण्यास वेळ लागल्याचे स्पष्टीकरण दिग्दशक उमेश शुक्‍ला यांनी दिले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.