इथल्या माणसांचा विचार करणारा आमदार हवा – डॉ. अमोल कोल्हे

चेतन तुपे पाटील यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन

मुंढवा – आलिशान, महागड्या गाडीची हौस असणे चांगले आहे, पण ती स्वकष्टार्जित असावी कोणाच्या मेहेरबानीने लाभलेली नसावी, असा टोला डॉ. अमोल कोल्हे यांनी शुक्रवारी हडपसर येथे विद्यमान आमदारांना भर सभेत लगावला. हडपसर विधानसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार चेतन तुपे पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.

हडपसर विधानसभेस राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने चेतन तुपे पाटलांच्या रुपाने सुसंस्कृत व सुशिक्षित चेहरा उमेदवार म्हणून दिला आहे. आबालवृद्धांना, माता-भगिनी, युवकांना आपले वाटणारे हे नेतृत्व आहे. हडपसरचा खुंटलेला विकास सामान्यांचा विचार करणारा चेतन तुपे यांच्यासारखा उमदा नेताच करू शकतो, असेही डॉ. कोल्हे म्हणाले.

भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या आमदारांना त्यांची योग्य जागा दाखविण्याची हीच वेळ आहे. हडपसरच्या विकासात असलेली बाधा दूर करण्यासाठी आता निकराची लढाई करावी लागणार आहे. हडपसरचा, इथल्या माणसांचा विचार करणारा आमदार जनतेला निवडून द्यावा लागेल, असे आवाहनही खासदार डॉ. कोल्हे यांनी यावेळी केले.

हडपसर विधानसभा मतदारसंघात चेतन तुपे पाटलांच्या रुपाने फक्‍त उमेदवार उभा नाही तर, आदरणीय शरद पवार साहेबांचा विचार उभा आहे. साहेबांच्या विचाराला महाराष्ट्र साद देत असताना हडपसरने मागे राहू नये. येत्या 21 ऑक्‍टोबर रोजी चेतन तुपे यांना मोठ्या मताधिक्‍याने निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी कैलासमामा कोंद्रे, प्रशांत जगताप,राजलक्ष्मी भोसले, पुजा कोंद्रे, वैशाली बनकर, बंडू तात्या गायकवाड, अजित गायकवाड,साहेबराव लोणकर, संजय गायकवाड, डॉ. लाला गायकवाड यांच्यासह राष्ट्रवादी व मित्रपक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)