आमदार आले अन्‌ दहा लाखांचा निधी देऊन गेले

दौंड – सोनवडी (ता. दौंड) येथील विठ्ठल मंदिरातील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली. हरिनाम सप्ताहाच्या सांगता समारंभाच्यानिमित्त आमदार राहुल कुल उपस्थित होते.

आमदार कुल यांनी या विठ्ठल मंदिरासमोर सभामंडपासाठी पाच लाखांचा निधी दिला, त्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला होता. मात्र, त्या ठिकाणी ही जागा कमी पडत असून, मोठ्या सभामंडपाची किंवा पत्रा शेडची गरज असल्याचे समालोचन करणाऱ्याने सांगत आमदार कुल यांच्याकडे निधीची मागणी केली. त्यानंतर आमदार कुल हे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, या ठिकाणी किती आकाराचे शेड करायचे, कसे करायचे याबाबत तुमची मतांतर आहेत, त्यामुळे याच ठिकाणी मी दहा लाखांचा निधी जाहीर करून आजच तसे पत्र देतो, असे म्हणून तात्काळ पत्र त्यांनी दिले. त्यामुळे उपस्थित भाविक खूश झाले आणि त्याननतर आमदार काल्याच्या कीर्तनाला आले आणि दहा लाख देऊन गेले, अशी चर्चा सोनवडीसह परिसरात रंगली.

Leave A Reply

Your email address will not be published.