मुंबई – बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि अभिनेत्री दिशा पटानी यांच्या आगामी ‘मलंग’ चित्रपटाचा फर्स्ट लूक काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला आहे. तसेच या चित्रपटाचा ऑफिशल ट्रेलर ६ जानेवारी २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दरम्यान, ‘मलंग’ चित्रपटाच्या पोस्टर मध्ये आदित्य आणि दिशा पटानी यांचा हटके अंदाज दिसून येत आहे. ‘मलंग’ चित्रपटाच्या सेटवर बिकिनीमधले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. लाल रंगाच्या बिकिनीत दिशा ग्लॅमरस लुकमध्ये आपल्याला दिसत आहे.
दिशाचे बिकिनीमधले हे फोटो मलंग चित्रपटाच्या सेटवरचे आहेत. दिशाने हा फोटो शेअर करत आपल्या चित्रपटाचे नावही नमुद केले आहे. या फोटोमध्ये दिशा समुद्रात खेळताना दिसत आहे.
दरम्यान, हा चित्रपट एका सुंदर लोव्हस्टोरी वर आधारित असणार आहे. सूत्रांच्या माहिती नुसार, चित्रपटात आदित्य अफलातून जबरदस्त अॅक्शन सीन आणि स्टंट करताना दिसणार आहे.