….. तेव्हा भारताची क्षेपणास्त्रे तयार होती

नवी दिल्ली – विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना सोडले नाही तर पाकिस्तानने युद्धासाठी तयार राहावे, असा इशारा भारताने पाकिस्तानला दिला होता. 27 फेब्रुवारी रोजी भारत पाकिस्तानविरुद्ध मिसाईल युद्ध करण्यासाठी सज्ज झाला होता. पाकिस्तानकडूनही हल्ला केल्यास चोख उत्तर देऊ असे सांगण्यात आले होते.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशातील गुप्तचर यंत्रणांचे अधिकारी एकमेकांच्या संपर्कात होते. ज्यावेळी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान आमच्या ताब्यात आहे असे पाकिस्तानने घोषित केले त्यावेळी भारताने पाकिस्तानला हा इशारा दिला होता.

पाकिस्तान सैन्यांनी अभिनंदन यांना कैद केले होते. एअर स्ट्राइकनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला होता. भारत आणि पाकिस्तानमधील नेते एकमेकांना आव्हान देण्याची भाषा करत होते. मात्र, पडद्यामागे रॉचे अधिकारी आणि पाकिस्तान इंटर सर्व्हिसेज इंटेलिजेंसचे अधिकारी यांच्यात संवाद सुरू होता.

जर पाकिस्ताने अभिनंदन यांच्या जीवितास धोका पोहोचेल असे काही कृत्य केलं तर भारत पाकिस्तानविरुद्ध कडक कारवाई करेल, अशी माहिती अमेरिकेला दिली हाती. त्यानंतर पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तानी लष्कर यांनी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना कैदेत ठेवून काही फायदा नसल्याने अभिनंदन यांना भारताला सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.