पाचवड बसस्थानकाची खड्ड्यांमुळे दयनीय अवस्था

सातारा – महामार्गाला लागूनच असलेल्या पाचवड बसस्थानकात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे एसटी चालकांनाही मोठी कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे गेल्या महिन्यातच बसस्थानकात पडलेल्या ख्यात एसटी बस रुतून बसण्याचा प्रकार घडला होता.

मात्र त्यानंतरही एसटी व्यवस्थापनाकडून स्थानकातील ख्यांच्या दुरुस्तीबाबत कोणत्याही उपाय योजना केलेल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांमधूनही संताप व्यक्त होत आहे.
पाचवड बसस्थानक हे मध्यवर्ती ठिकाणी असल्याने जावली तालुक्‍यासह वाई तालुक्‍यातील पुण्या मुंबईला जाणारे अनेक प्रवासी या याठिकाणी येत असतात. मात्र बसस्थानकात पडलेल्या मोठमोठ्या ख्यांमुळे पुण्या मुंबईला जाणाऱ्या एसटी बसेस या स्थानकात न येताच स्थानकाबाहेरच सेवारस्त्यावर उभ्या राहतात.

त्यामुळे अनेकदा एसटी येऊन गेलेलीही प्रवाशांना समजत नाही. गेल्या महिन्यात परतीच्या पावसामुळे स्थानकातील सर्व खड्डे पाण्याने भरल्यामुळे वाहनधारकांना वाहने चालविणेही मुश्‍किल झाले होते. तसेच एका बसच्या चालकाला ख्याचा अंदाज न आल्यामुळे चक्क एसटी स्थानकातील ख्यात रुतून बसली. त्यामुळे एसटीमध्ये असणाऱ्या प्रवाशांनाही नाहक त्रास सहन करावा लागला. या घटनेनंतर व्यवस्थापनाकडून खड्डे भरण्याची अपेक्षा होती. मात्र अद्यापही बसस्थानकातील खड्ड्यांमध्ये साधा मुरुमदेखील पडलेला नाही. त्यामुळे प्रवाशांसह वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. तरी संबंधितांनी तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.