गुणकारी लसूण
लसूणमध्ये व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन सी, सेलेनियम, फायबर्सचे प्रमाण भरपूर असते. याशिवाय त्यात कॅल्शिअम, पोटॅशियम, लोहही असतात.
1. कोलेस्ट्रॉल कमी करते – लसूण खाण्यामुळे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते. चांगले कोलेस्ट्रॉल वाढते. शरीरास हानिकारक असलेल्या रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉलला निंयत्रित ठेवण्याचे काम लसूण करते. त्यासाठी दररोज 2 ते 3 पाकळ्या जरूर खाव्यात.
2. रक्तदाब नियंत्रित ठेवतो – उच्च रक्तदाबानचा त्रास असणाऱ्यांनी आहारात लसूणचा वापर करावा. त्यामुळे रक्तदाब आटोक्यात राहण्यास मदत होते. दररोज 2 ते 3 कच्चा लसूण पाकळ्या खाव्यात.
3. ह्रदयविकार दूर ठेवतो – लसणामुळे रक्ताचे शुद्धीकारण होते. अँटी क्लाटिंग गुणांमुळे रक्त पातळ होते. वाहिन्यांत रक्ताच्या गाठी तयार होत नाहीत.
4. रोग प्रतिकार शक्ती सुधारते – लसूण खाल्ल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढते. हवामान बदलामुळे होणाऱ्या सर्दी आणि खोकल्यापासून दूर राहण्यास मदत होते.
5. स्ट्रेटच मार्क्स दूर होतात – अनेकांच्या शरीरावर स्ट्रेटच मार्क्स असतात. हे स्ट्रेटच मार्क्स लठठपणामुळे किंवा इतर कारणामुळे शरीरावर येतात. ते लवकर जात नाही. लसणाचा रस काढून हा रस ऑलीव्ह ऑइलमध्ये मिसळा. हे मिश्रण गरम करा आणि थंड झाल्यानंतर हे स्ट्रेटच मार्कवर लावून मसाज करा. दररोज हा उपाय केल्याने नक्कीच फरक जाणवू शकतो.
डॉ आदिती पानसंबळ आहारतज्ज्ञ, नगर.
संपर्क : 7385728886
Advertisement between reading is very irritating.