आयुष मंत्रालयाचे ई-औषध पोर्टल कार्यरत

नवी दिल्ली – केंद्रीय आयुष मंत्रालयाकडून आयुर्वेद, सिद्द, युनानी आणि होमिओपॅथिक औषधाचा परवाना मिळण्यासाठी एक ऑनलाइन सुविधा सुरू करण्यात आली आहे. ही सुविधा अगदी सुलभ व्हावी याच्यासाठी सरकारने ई-औषध या नावाने पोर्टल नुकतेच सादर केले आहे.

या सादरीकरणावेळी आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. सदर पोर्टलचे सादरीकरण करून बाजारात होत असणाऱ्या औषध क्षेत्रातील गैरप्रकार आणि त्यासंदर्भातील सर्वसामान्य लोकांचा होत असणारा छळ यापासून बचाव करण्यासाठी या सुविधेचा सकारात्मक उपयोग होणार असल्याचे स्पष्टीकरण श्रीपाद नाईक यांनी दिले आहे.

नवीन आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता वापर जीवनावश्‍यक क्षेत्रांतील सुविधा देण्यासाठी आगामी काळात करण्यात येणार आहे. तर नवीन बदल आणि त्यासंदर्भातील योजनाची तत्काळ योग्य ती माहिती उपलब्ध करून देण्यासाठीच या व्यासपीठाचा वापर केला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.