मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात ‘सुषमा अंधारे’ हे नाव चांगलेच चर्चेत आले आहे. शिवसेनेच्या नेत्या म्हणून त्यांनी आपल्या वकृत्वातून राजकीय नेत्यांना चांगलेच सुनावले आहे. त्यांच्या भाषणांना मुळे शिवसेनेला एका नवीन चेहरा मिळाला असल्याची भावना व्यक्त केली जाता आहे.
दरम्यान, आपल्या व्यक्तव्यामुळे सतत चर्चेत असणाऱ्या सुषमा अंधारेंची एक फेसबुक पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. ठाकरे गटाच्या रणरागिणी आणि कणखर लढाऊ नेत्या समजल्या जाणाऱ्या सुषमा अंधारे यावेळी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. मायलेकीच्या जीवापाड प्रेमाची आणि मातेच्या ममतेची साक्ष देणारीच अशी ही पोस्ट आहे.
सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्ट..!
शिवगर्जना सप्ताहाच्या सलग सभा सुरु आहेत.. वरळीची सभा संपवून वायुवेगाने मन लेकीकडे धावतंय….पण लोणावळा घाटातील ट्रॅफिक जणू माझा रस्ता अडवून थांबलंय.. दिड दोन तासांपूर्वी चा कणखर लढावू बाणा गळून पडलाय… समोरची अजस्त्र वाहनांची अस्ताव्यस्त ट्रॅफिक बघुन “पराधीन जगती पुत्र मानवाचा ” या ओळींची यथार्थता अनुभवतेय…
12 वाजलेत…. लेकीचा वाढदिवस आहे.. आत्ता या क्षणाला मी तिच्या सोबत असायला हवं.. अर्थात् नसले तरी रुसण्या इतकं फुरंगटून बसण्या इतकं कळतं वय तरी कूठे आहे म्हणा..? ….पण जो वसा हातात घेतलाय तोही तितकाच महत्वाचा…! आत्ता जी मनाची घालमेल होतेय ती कदाचीत फक्त रुपाली ठोंबरे पाटील ही मैत्रिणच समजू शकेल..! कारण 11 फेब्रुवारीला तिच्या विरूचा वाढदिवस होता.
कब्बुपेक्षा फक्त 16 दिवसांनी मोठा आहे तो.. अन् त्याच्या वाढदिवसाला ईच्छा असूनही कामामुळे रूपाली पोचू शकत नव्हती. वरुन कीतीही खमकेपणा दाखवला तरी त्यादिवशी फ्लाईट मध्ये तिचा रडवेला चेहरा अन् आरक्त डोळे तिच्यातल्या व्याकूळ आईचं काळीज डोकावत होतं… असो भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असते.. याक्षणी शिवसैनिकांनी रक्ताच पाणी करुन वाढवलेली शिवसेना बेइमानांच्या कपटजालात अडकली आहे ती सोडवलीच पाहिजे…