जाणून घ्या: सायबर लुटारूंची कार्यपद्धती (भाग१)

आता संगणकीकरण आणि डिजिटलायझेशनमुळे बॅंकांमधील सुरक्षेच्या पद्धती बदलल्या आहेत. वीस वर्षांपूर्वी अशी स्थिती होती की, बॅंकेतील आपल्या खात्यातून पैसे काढायचे असतील तर पासबुक व पैसे काढण्याची स्लीप भरून बॅंकेत जाऊन रांगेत उभे रहावे लागत असे. अर्थातच ही अत्यंत वेळखाऊ पद्धती होती. आता ही पद्धत केव्हाच मागे पडली आहे. आता आपण पटकन दिवसा-रात्री-पहाटे केव्हाही एटीएममध्ये जातो आपले कार्ड इनसर्ट करून पिन नंबर टाकून पैसे काढतो. त्याचबरोबर पैसे ट्रान्सफर करण्यासाठी मोबाईल बॅंकिंगसह अनेक ऍप उपलब्ध आहेत.

अर्थात जितक्‍या जास्त सुविधा तितकेच सुरक्षेचे प्रश्नही किचकट बनले आहेत. हॅकर्स केवळ वैयक्तिक बॅंक खात्यातीलच नव्हे तर कथित तगडी सुरक्षा असलेल्या बॅंकांमधील कोट्यवधी रुपये परदेशात बसून लुटू लागले आहेत. त्यामुळे या हॅकर्सची कार्यपद्धती समजावून घेऊन त्यांच्यापासून आपले कष्टाचे पैसे सुरक्षित कसे राहतील याची काळजी घेतली पाहिजे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बॅंकेतून येणारा दूरध्वनी – बॅंक कधीही दूरध्वनी करून तुम्हांला तुमचा पिन, ओटीपी, आधार कार्ड क्रमांक, पॅन क्रमांक विचारत नाही. तशी जागृती करणारे एसएमस बॅंकांकडून वारंवार पाठवले जातात. असे असले तरी बॅंकेतून बोलत असल्याचे सांगून तुम्हांला दूरध्वनी करण्यात येतो. स्वतःला बॅंक कर्मचारी म्हणवणारी ही व्यक्ती प्रत्यक्षात लुटारू असते. ऑनलाईन पद्धतीने तुमच्या खात्यावर डल्ला मारण्यासाठी तिने तुम्हांला फोन केलेला असतो.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)