आरोग्य विमा योजनेचा मेसेज ही अफवाच : लष्कर प्रशासन

पुणे – लष्कर प्रशासनाने सैनिकांसाठी आरोग्य विमा योजनेला मान्यता दिल्याचा संदेश गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र लष्कर प्रशासनाने या बाबीचे खंडन केले आहे. अशा प्रकारच्या कोणत्याही विमा योजनांना मान्यता दिली नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच सेवारत आणि सेवानिवृत्त सैनिकांनी अशा अफवांना बळी पडून नये, असे आवाहन लष्कर प्रशासनाने केले आहे.

लष्करातर्फे अधिकारी आणि जवानांसाठी सैनिक सेवा समितीची आरोग्य विमा सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, सेवेतील आणि सेवानिवृत्त अशा दोन्ही सैनिकांना या आरोग्य विमाचा लाभ घेता येईल, अशा आशयाचा संदेश काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याची माहिती लष्कर प्रशासनाला मिळाली. त्यानंतर याबाबत तातडीने खुलासा करत, लष्करातर्फे अशा कोणत्याही विमा योजनांना मान्यता दिले नसल्याचे स्पष्ट केले आहे.

तसेच सेवारत आणि सेवानिवृत्त सैनिकांनी अशाप्रकारच्या अफवांना बळी पडून नये, असे आवाहन लष्कर प्रशासनाने केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.