पुणे : आपल्या लाडक्या बाप्पाला आज सर्वजण निरोप देत आहेत. पुण्यात मानाच्या पाचही गणपतींच्या विसर्जन मिरवणूकीस सुरूवात झाली आहे. दरम्यान, या मिरवणूकीत ओम नमो परिवर्तन परिवार पिंपळे गुरव ग्रुपतर्फे वैद्ज्ञानिक दृष्टिकोन ठेवत अवयव दानाचा संदेश देण्यात आला आहे. अवयव दान, सर्वश्रेष्ठ दान…करा जीवनदान, मिळवा मान, अशा संदेश देणाऱ्या टोप्या या ग्रूपच्या सदस्यांनी डोक्यावर घेवून सर्वांना अवयव दानाचे महत्व सांगितले.