स्मरण: आठवणीतील कुसुमाग्रज… वास्तल्यमुर्ती !

डॉ. अरविंद नेरकर

मराठी काव्य समृद्ध करणारे कवी, समर्थ नाटककार, जीवनानिष्ठांची जपणूक करणारे पुरोगामी विचारवंत, वात्सल्यमूर्ती कुसुमाग्रज-वि. वा. शिरवाडकर. कुसुमाग्रज या नावाभोवती मराठी मनाची गुंफण झालेली असल्याने कुसुमाग्रज नाव उच्चारताच विनम्रभावाने आपण सारे नतमस्तक होतो. कुसुमाग्रज म्हणजे नव्याजुन्या लेखकांचे श्रद्धास्थान. आपली साहित्यकृती दाखवावी, शाबासकीची थाप मिळवावी म्हणून कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी कवी-लेखकांची सदैव वर्दळ असे. कुसुमाग्रज या लेखक-कवींचे मनापासून कौतुक करायचे. इ.स. 1932 मध्ये त्यांनी रत्नाकर मासिकात लेखन करायला सुरुवात केली. पुण्याचा दैनिक प्रभात, सा. धनुर्धारी, आचार्य अत्रे यांचा नवयुग, अशा विविध ठिकाणी त्यांनी सन 1942 पर्यंत काम केले. याच वर्षी त्यांचा “विशाखा’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. या कवितासंग्रहाला वि.स. खांडेकर यांची अकरा पानांची प्रस्तावना आहे. कुसुमाग्रज दैनिक “प्रभात’मध्ये उपसंपादक असताना “गर्जा जयजयकार क्रांतीचा’ ही कविता कागदवार उतरली. “रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल’ या काव्यपंक्ती पारतंत्र्याची बंधने तोंडून क्रांतिकारकांच्या आंतरिक सामर्थ्याला साद घालतात.

त्यांनी अनेक नाटके लिहिली. पैकी “नटसम्राट’ नाटकाने वि. वा. शिरवाडकर घराघरात पोहोचले. श्रेष्ठ नट आप्पासाहेब आणि मुलांचा पिता यातील द्वंद्व या नाटकात पाहताना प्रत्येकजण आपल्या जीवनाकडे अंतर्मुख होऊन विचार करू लागला. कुसुमाग्रज अर्थात तात्यासाहेब शिरवाडकर यांना अनेक मानसन्मान प्राप्त झाले. त्यांच्या साहित्यकृतींचा गौरव करण्यात आला. इ.स. 1986 साली त्यांना पुणे विद्यापीठाने डी.लिट. देऊन सन्मानित केले, तर इ.स. 1988 रोजी त्यांना ज्ञानपीठ या पुरस्काराने गौरवण्यात आले.

कुसुमाग्रज या वात्सल्यमूर्तीचा मी अगदी शाळकरी विद्यार्थी असल्यापासूनचा जवळचा संपर्क नाशिकला 27 फेब्रुवारी 1999 ला झालेल्या अखेरच्या भेटीपर्यंत कायम राहिला. सुमारे 25-30 वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात तात्यासाहेबांच्या भेटीचे सुवर्णक्षण माझ्या आठवणीच्या कोंदणात मनापासून जपून ठेवलेले आहेत.

तात्यासाहेबांची माझी पहिली भेट मला चांगली आठवते. मराठीच्या शिक्षकांनी “गर्जा जयजयकार क्रांतीचा’ कविता शिकवली, त्यावेळी चंदन बेदरकर नावाचा वर्गमित्र म्हणाला, “अरविंद, आम्ही कुसुमाग्रजांच्या शेजारी राहतो. येतोस का? शाळा सुटल्यावर मित्राबरोबर मी तात्यांच्या घरी गेलो. दारावरची बेल वाजविल्यावर तात्यांनीच दार उघडले. एका तेजस्वी, भारदस्त व्यक्तीच्या दर्शनाने मन प्रफुल्लित झाले. तात्यांनी मला नाव विचारले, काय वाचतोस विचारल्यावर मी कविता आवडतात सांगितले आणि मराठीच्या शिक्षकांनी शिकवलेली “गर्जा जयजयकार क्रांतीचा’ ही कविता म्हटली. तात्यांनी शाबासकी दिली आणि टेबलावरच्या वाटीतील सफरचंदाच्या दोन फोडी दिल्या. मी तात्यांच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार केला. तात्यांचा आशीर्वाद मिळाल्याचा तो परिस्पर्श आठवला, की मन आनंदून जाते. एवढ्या मोठ्या कवीला आपण भेटलो हे लक्षात राहिले. त्यांचं मोठेपण नेमकं काय हे कळण्याइतकी समज त्यावेळी निश्‍चित नव्हती.

माध्यमिक शिक्षणानंतर वृत्तपत्रविद्या पदवी शिक्षण घेण्यास वडिलांचा विरोध होता. पण तात्यासाहेबांकडे गेल्यावर आणि माझ्या इच्छेला तात्यांच्या संमतीमुळे वडिलांचा विरोध मावळला आणि वडिलांनी मला पुण्याला पाठविण्यास होकार दिला. माझ्या वडिलांचा वाढदिवस हा तात्यांच्या वाढदिवशी म्हणजे 27 फेब्रुवारीस असे. माझे वडीलही उत्तम लेखक व सेवाभावनेने कार्यरत असलेले व्यक्तिमत्त्व होते. तात्या हे वडिलांचेही श्रद्धास्थान होते.

नोकरीच्या काळात माझे प्रसिद्ध झालेले लेख तात्यांना दाखविण्यासाठी मी अधून मधून भेटायचो. जून 1975 मध्ये आणीबाणी जाहीर झाली. त्यावेळी मी नाशिकच्या “गावकरी ‘त वार्ताहर म्हणून काम करताना तात्यांचा घनिष्ठ संबंध आला. त्यांच्या भाषणांवरून केलेले वार्तांकन मी आवर्जून भेटून त्यांना दाखवीत असे.

नाशिक विभागात काम करताना तात्यासाहेबांच्या सान्निध्याच्या संधीमुळे विशेष आनंद झाला. इ.स. 1979-83 पर्यंत नाशिकला काही सांस्कृतिक संस्थांचा पदाधिकारी असताना मला तात्यासाहेबांच्या मार्गदर्शनाचा लाभ होत असे. तेव्हाच “सप्तशृंग दर्शन’ द्वारे मी ग्रंथलेखनाकडे वळलो. पुस्तकाला तात्यांचा आशीर्वादपर अभिप्राय लाभला होता. माझ्या विवाहाच्या स्वागत समारंभप्रसंगी तात्यासाहेब प्रकृती बरी नसतानाही आम्हा उभयतांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते. त्यांनी आशीर्वादपर दिलेली सप्रेम भेट अद्यापही माझ्या स्मरणात आहे. इ.स. 1986 मध्ये माझी पुण्याला बदली झाली. पुण्यात 1987 साली एम.ए. (मराठी)साठी पुणे विद्यापीठात बहिःस्थ विद्यार्थी म्हणून नोंदणी केली. दोन वर्षांनी एम.ए. पदवी प्रथमश्रेणीत मिळवली. दरम्यान आळंदी ते पंढरपूर अशी वारी करताचाच वारीविषयक संशोधनाचा निश्‍चय केला. नाशिकला आल्यावर तात्यासाहेबांना उत्साहाने म्हटले, तात्या, मी “पंढरपूर वारी आणि मराठी साहित्य’ हा विषय संशोधनासाठी घेतला असून माझा अभ्यास चालू आहे. तात्या लगेचच म्हणाले, “अरे, तुझा विषय चांगला आहे. परंतु मराठी साहित्यात पंढरपूर वारीविषयक संत नामदेवांचे अभंग आहेत. आणखी काय आहे?’

त्यावर अधिक न बोलता पुढच्यावेळी आल्यावर सविस्तर बोलण्याचा निर्धार केला. पुण्याला परतलो आणि सकलसंतगाथेचे दोन्ही खंड वाचून काढले. त्यातील संतांच्या एकूण 20 हजार अभंगात 350 अभंग (साडेतीनशे) वारीविषयक अभंग शोधून काढले. त्याची एकत्रित माहिती नोंद केली. नाशिकला आल्यावर माझ्या प्रबंधाच्या कामाची प्रगती तसेच वारीविषयक संतांच्या अभंगाची माहिती तात्यासाहेबांना उत्साहाने सांगितली. विशेष उल्लेख करायचा तर माझ्या प्रबंधाचे मार्गदर्शक डॉ. द. दि. पुंडे यांनी तात्यासाहेबांच्या साहित्यावर संशोधन करून पीएच.डी. पदवी मिळवली होती आणि तात्यासाहेब तर माझे दैवतच. हा एक विलक्षण योगायोग म्हटला पाहिजे. मी प्रबंधाची प्रत घेऊन नाशिकला आई-वडिलांना भेटायला गेलो, त्याचवेळी प्रबंधाची प्रत तात्यांच्या हातात देऊन त्यांच्या पायावर डोकं ठेवून आशीर्वाद घेतला. बराच वेळ प्रबंधाच्या अनुषंगाने तात्या मला विचारत होते. माझी तोंडी मुलाखत घ्यावी आणि मी उत्तरे द्यावीत असे चालले होते. निघताना वडिलांनी तात्यांना विचारले, तात्या, तुम्ही प्रबंधाला छान म्हटले. पण या प्रबंधासाठी विद्यापीठ अरविंदला पीएच.डी. पदवी देईल काय? तात्या यावर हसत हसत म्हणाले, “अहो, दादा अरविंदच्या या प्रबंधाचे बहिरंगाबरोबर अंतरंगही अतिशय उत्तम आहे. या प्रबंधाचे कुणीही परीक्षण केले तरी विद्यापीठ पीएच.डी. साठी प्रबंध निश्‍चित स्वीकारेल. तात्यांचे आशीर्वचन खरे ठरले.

वर्षभरात प्रबंधाचे सोपस्कार पूर्ण होऊन डॉ. श्री. रं. कुलकर्णी (हैदराबाद), डॉ. यू. म. पठाण (औरंगाबाद) यांनी परीक्षकाच्या भूमिकेतून परीक्षण केल्यानंतर दिलेल्या अनुकूल अभिप्रायानंतर तोंडी मुलाखत होऊन मला डॉक्‍टरेट पदवी मिळाली. माझी बढतीबद्दल तसेच पीएच.डी. मिळाल्याबद्दल तात्यासाहेबांनी पाठविलेली दोन्ही पत्रे अद्यापही फाईलमध्ये मी जपून ठेवली आहेत. माझ्या प्रबंधावरून होय होय वारकरी, अभंगाची वारी ही दोन पुस्तकं प्रकाशित झाल्यावर तात्यांनी माझं कौतुक करून पत्र पाठविले होते. 1995 साली माझं चिंता आणि चिंतन’ पुस्तक दैनिक “प्रभात’चे तत्कालीन संपादक माधवराव खंडकर यांच्या हस्ते प्रकाशित झालं होतं. या पुस्तकाबद्दल आशीर्वादपर अभिप्राय मी पुस्तकांच्या मलपृष्ठावर तात्यांच्या अक्षरातील छायाचित्र घेऊन जसाच्या तसा छापला होता. तात्यांनी माझे भरभरून कौतुक केल्याने मला खूप। खूप।। आनंद झाला. तात्यांच्या वेळोवेळी झालेल्या सर्वच भेटीचे सुवर्णक्षण तब्बल 25-30 वर्षांच्या कालावधीतील आठवणींचा खजिना आहे.

परवागी नोकरीनिमित्त वावरताना नाशिकला आई-वडिलांना भेटायला आल्यावर न चुकता तात्यांची भेट घेई. नोकरीतील नियुक्ती, बढती या सर्व क्षणी तात्यांचा आशीर्वाद मला लाभला आहे. तात्यांच्या पायावर डोकं ठेवून मिळालला आशीर्वाद म्हणजे परिसस्पर्श हा अनुभव प्रत्येकवेळी घेतलेला आहे. या परिसस्पर्शानं माझं जीवन उजळून निघालं आहे. तात्यासाहेबांची माझी शेवटची भेट 27 फेब्रुवारी 1999 रोजी झाली. 27 फेब्रुवारी हा तात्यांचा वाढदिवस. तात्यांच्या भेटीसाठी मी आणि माझे वडील शुभेच्छा देण्यासाठी पुष्पगुच्छ घेऊन तात्यासाहेबांच्या निवासस्थानी आलो. तेथे फलकावर लिहिले होते, “”तात्यांच्या वाढदिवसांच्या शुभेच्छा-पुष्पगुच्छ प्रतिष्ठान कार्यालयात द्याव्यात.

विशिष्ट स्वरूप लक्षात घेऊन, हे कलम लागू करण्यात आले आहे. कलम 370 म्हणजे, ज्या अन्वये भारतीय राज्यघटना काश्‍मीरमध्ये लागू होते, ते कलम. जम्मू आणि काश्‍मीर भारताचा अविभाज्य भाग आहेत, हे कलम तीनमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र कलम 370 अनुसार, जम्मू-काश्‍मीरला अनेक बाबतीत स्वायत्तता देण्यात आली. ही स्वायत्तता काढून घेतल्यास, राज्यात असंतोष निर्माण होईल, हे नक्की. भारतीय राज्यघटनेच्या तरतुदी जम्मू-काश्‍मीरमध्ये लागू करण्यासाठी भारत सरकारने 370व्या कलमाचा 5 वेळा उपयोग केला आहे. केवळ राष्ट्रपतींच्या आदेशान्वये राज्याचा विशेष दर्जा एकप्रकारे संपुष्टातच आणला गेला आहे. 1954 सालच्या आदेशान्वये, संपूर्ण राज्यघटनाच त्यातील दुरुस्त्यांसह काश्‍मीरला लागू करण्यात आली.

केंद्रीय सूचीतील 97 पैकी 94 आणि सामायिक यादीतील 47 पैकी 26 एंट्रीज’ राज्याला लागू करण्यात आल्या. जम्म्‌-काश्‍मीरच्या घटनेतील तरतुदींमध्ये दुरुस्ती करण्यासाठीही केंद्र सरकारने 370व्या कलमाचा वापर केला आहे. वास्तविक या कलमानुसार, राष्ट्रपतींना हा अधिकार प्रदान करण्यात आलेला नाही. कलम 35 अ हे 370व्या कलमातूनच आले आहे. 1954 साली राष्ट्रपतींच्या आदेशानुसार ते लागू करण्यात आले. घटनेच्या मुख्य आराखड्यात ते नाही. वास्तविक जमीन खरेदीवरील नियंत्रणे काही ईशान्येकडील राज्यांत, तसेच हिमाचल प्रदेशातदेखील आहेत. त्याचप्रमाणे शिक्षणसंस्थांमधील प्रवेशात तसेच नोकऱ्यांमध्येही अधिवासाधारित आरक्षणे आहेत. त्यामुळे 35 अ बाबत या अनेक मुद्‌द्‌यांचा विचार करूनच निष्कर्षाप्रत यावे लागेल.
कशारपीं.वशीरळ001सारळश्र.लो

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)