गर्दी न जमल्याने सभा करावी लागली रद्द; अनुपम खेर माध्यमांवर संतापले 

चंदीगड – अभिनेता अनुपम खेर सध्या आपली पत्नी भाजप उमेदवार किरण खेर यांच्या प्रचारामध्ये व्यस्त आहेत. किरण खेर यांच्या प्रचारार्थ चंदीगडमध्ये अनुपम खेर सोमवारी सभा घेणार होते. मात्र या गर्दी न जमल्याने भाजपला ही सभा रद्द करावी लागली. यामुळे तेथील स्थानिक माध्यमांमध्ये या वृत्ताला पान एकवर जागा मिळाली होती. या वृत्तांमुळे अनुपम खेर चांगलेच संतापले आहेत.

अनुपम खेर यांनी म्हंटले कि, मी ५१५ चित्रपटांमध्ये काम केले आहे. परंतु, सर्वच चित्रपट हिट ठरले असे नाही. अनुपम खेर यांनी ट्विट करत म्हंटले कि, मी सभेच्या ठिकाणी वेळेआधी पोहोचल्याने तेथे गर्दी नव्हती. म्हणून मी दुसऱ्या ठिकाणी सभेस गेलो. त्याठिकाणी चांगली गर्दी होती. दुसरा फोटो पहिल्या फोटोएवढाच खरा आहे. वृत्तपत्रे याही फोटोला वर्तमानपत्रात जागा देतील अशी आशा आहे. तेव्हाच वर्तमानपत्रे तटस्थ आहेत, असे मी मानेल, असे खेर यांनी सांगितले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.