पिंपरी-चिंचवडमध्ये होणार महापौर परिषद

पिंपरी  – पिंपरी-चिंचवड महापालिकेला यंदाच्या महापौर परिषदेचे यजमानपद मिळाले आहे. येत्या 25 व 26 ऑगस्टला शहरात ही विसावी महापौर परिषद आयोजित केली जाणार आहे. दोन दिवसीय निवासी परिषदेच्या आयोजनासाठी शहरातील जागेची चाचपणी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती महापौर राहुल जाधव यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी बुधवारी (दि.19) दिली.

अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, मुंबई व महाराष्ट्र महापौर परिषद यांच्या संयुक्‍त विद्यमाने 19 व्या महापौर परिषदेचे आयोजन 11 जूनला लोणावळा येथे करण्यात आले होते. राज्यातील विविध 16 महापालिकांचे महापौर उपस्थित होते. यापुढील महापौर परिषद पिंपरी-चिंचवड शहरात आयोजित करण्यात येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित केले जाईल, अशी महिती महापौर जाधव यांनी पूर्वीच दिली होती. त्यानंतर आता 25 आणि 26 ऑगस्टला ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. सर्व 27 महापौरांची परिषद स्थापन झाली असून बृहन्मुंबई महापालिकेचे महापौर हे या परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात.

Leave A Reply

Your email address will not be published.