#ICCWorldCup2019 : पावसामुळे #AFGvSL सामना थाबंला; श्रीलंका 8 बाद 182 (33)

कार्डिफ – पावसाच्या व्यत्ययामुळे विश्वचषक स्पर्धेतील श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना काही वेळासाठी थांबविण्यात आला आहे. पावसामुळं खेळ थांबला तेव्हा श्रीलंकेच्या 33 षटकांत 8 बाद 182 धावा झाल्या आहेत. सुरंगा लकमल हा 2 तर लसिथ मंलिगा शून्यावर खेळत होते.

श्रीलंकेचे सलामीवीर दिमुथ करूणारतने आणि कुसल परेरा यांनी अफगाणिस्तानच्या गोलंदाजाची धुलाई करत संघाला सातच्या धावगतीने धावा करून देत संघाला 13.1 षटकांत 92 धावांची मजल मारून दिली. मात्र, मोहम्मद नाबीने दिमुथ करूणारतने (30) याला बाद करत ही सलामीची जोडी फोडली. त्यानंतर दिमुथ करूणारतने आणि लाहिरू थिरिमाने यांनी संघाची धावसंख्या शंभरी पार नेली, मात्र 21 व्या षटकांत लाहिरू थिरिमाने (25) याला मोहम्मद नबीने बाद केले. मात्र त्यानंतर कुसल परेरा यांच्याशिवाय एकही श्रीलंकेचा फंलदाज मैदानावर फार काळ टिकू शकला नाही. मधल्या फळीचे फलंदाज कुसल मेंडिस 2, एंजलो मॅथ्यूज आणि धनंजया डि सिल्वा शून्यावर बाद झाल्याने श्रीलंकेच्या संघाची अवस्था 8 बाद 180 अशी झाली होती.  श्रीलंकेकडून कुसल परेरा याने सर्वाधिक 78 धावा केल्या.

अफगानिस्तानकडून गोलंदाजीत मोहम्मद नाबीने 9 षटकांत 30 धावा देत 4 तर दौलत जादरान, हामिद हसन आणि राशिद खान यांनी प्रत्येकी1 गडी बाद केला आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.