आधी निकाह होईल, त्यानंतर…. – ओवेसी

शिवसेना आणि काँग्रेसला पाठिंबा देणार नाही – ओवेसी

नवी दिल्ली – राज्यात 19 दिवसांपासून सुरु असलेला सत्तासंघर्ष अखेरच्या टप्प्यावर आहे. आता ‘महाशिवआघाडी’चे सरकार स्थपन करण्यासाठी राजकीय घडामोडींचा वेग आला आहे. शिवसेनेच्या पाठिंब्याविषयी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये खलबत्ते चालू आहेत. या पार्श्वभूमीवर एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांनी आपण शिवसेना आणि काँग्रेसला पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

असदुद्दीन ओवेसी म्हणाले कि, आम्ही भाजप तसेच शिवसेनेला पाठिंबा देणार नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेला पाठिंबा देत असल्याचा मला आनंद आहे. कोण कोणाची मते फोडत होता आणि कोण कोणाबरोबर काम करीत आहे हे लोकांना कळेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री झाल्यास तुम्ही पाठिंबा देणार का? यावर ओवेसी म्हणाले कि, आधी निकाह होईल. त्यानंतर मुलगा का मुलगी होईल याचा विचार केला जाईल. अद्याप निकाहही नाही झाला. आताच काही सांगता येणार नाही. हा सगळा एकप्रकारचा खेळ आहे, असेही त्यांनी सांगितले.

‘धर्मनिरपेक्ष’ पक्षांच्या पराभवासाठी जे मला, माझा पक्षाला आणि आमच्या मतदारांना दोष देत होते त्यांना आता शांत होण्यासाठी एक कारण मिळालं आहे. महाराष्ट्रातील एमआयएमचे २ आमदार शिवसेना-कॉंग्रेस सरकारला पाठिंबा देणार नाहीत. त्याच संदर्भात एक पत्र राज्यपालांना पाठवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.