अभिनेत्री अश्रिता शेट्टी आणि क्रिकेटपटू मनिष पांडे यांचा विवाह झाला. रविवारी सैयद मुश्ताक ट्रॉफीच्या फायनलमध्ये खेळल्यानंतर लगेच सोमवारी मनिष पांडे बोहल्यावर उभा राहिला. या दोघांच्या लग्नाचे काही फोटो इंटरनेटवर रिलीज झाले आहेत. लग्नाच्या रितीरिवाजांचे काही व्हिडीओदेखील खूप व्हायरल झाले आहेत.
विवाहाप्रसंगी अश्रिता अगदी दक्षिण भारतीय वेशभुषेमध्ये सजली होती. महरुन आणि गोल्डन रंगाची साडी तिने नेसली होती. या वेशभुषेत ती खूपच सुंदर दिसत होती. तर मनिष पांडेने क्रिम रंगाची शेरवानी परिधान केली होती. दोघेही एकमेकाअंबरोबर खूपच आनंदात दिसत होते.
लग्नाच्या आदल्या रात्री मस्त गाणे बजावण्याचा कार्यक्रम रंगला होता. पाहुण्यांनी आणि मित्रमंडळींनी अश्रिताला एखाद्या गाण्यावर डान्स करण्याचा आग्रह केला. तिने “बदरी की दुल्हनियां’ गाण्यावर डान्स केला. या डान्सचा व्हिडेओही खूप लोकप्रिय होतो आहे.
26 वर्षांची अश्रिता शेट्टी बॉलिवूडमध्ये विशेष सक्रिय नाही. पण दक्षिणेतल्या सिनेमांमध्ये ती नावाजलेली अभिनेत्री आहे. तिथल्या अनेक मोठ्या सिनेमांमध्ये तिने काम केले आहे. त्याशिवाय 2010 मध्ये “क्लीन ऍन्ड क्लिअर फ्रेश फेस’ चा किताबही तिने जिंकला आहे.