मतदानाच्या दिवशी आठवडे बाजार बंद

सर्व जत्रादेखील पुढे ढकलण्यात आल्याचे आदेश जारी

नगर –  जिल्ह्यात दि. 23 एप्रिल रोजी नगर व दि. 29 एप्रिल रोजी शिर्डी लोकसभा मतदार संघात मतदान होणार आहे. या दिवशी असणारे आठवडे बाजार भरविण्यास मनाई करण्यात येत आहे. तसेच जत्रा पुढे ढकलण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होवू नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना मार्केट ऍन्ड पेअर ऍक्‍ट 1862 चे कलम 7 (अ) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्ह्यातील सिमेच्या हद्दीत दि.23 एप्रिल नगर व दि. 29 एप्रिल शिर्डी लोकसभा मतदार संघातम मतदान होणार आहे.

या मतदानाच्या दिवशी असणारे आठवडे बाजार भरविण्यास मनाई करण्यात येत आहे. तसेच दि. 23 व 29 एप्रिल रोजी मतदानाच्या दिवशी असणाऱ्या जत्रा पुढे ढकण्यात येत आहेत. दि. 23 एप्रिल रोजी अहमदनगर लोकसभा मतदार संघ- उपविभागीय दंडाधिकारी नगर भाग- नगर तालुक्‍यातील आठवडे बाजार नगर शहर, पोखर्डी, खोसपूरी, खंडाळा व जत्रा आठवड, शिराढोण व नेवासा तालुक्‍यातील आठवडे बाजार माळीचिंचोरा, भेंडा बु. माका, सलाबतपूर, उपविभागीय दंडाधिकारी श्रीगोंदा – पारनेर भाग- श्रीगोंदा तालुक्‍यातील आठवडे बाजार मांडवगण, चिंभळे, देवदैठण, अजनूज व जत्रा पारगाव सुद्रीक व पारनेर तालुक्‍यातील आठवडे बाजार टाकळीढोकश्‍वर, निघोज, देठणे गुंजाळ, उपविभागीय दंडाधिकारी कर्जत भाग- कर्जत तालुक्‍यातील आठवडे बाजार- राशीन.जामखेड तालुक्‍यातील आठवडे बाजार पिंपरखेड, जातेगाव व जत्रा फक्राबाद, धानोरा, बंजारवाडी, उपविभागीय दंडाधिकारी पाथर्डी भाग – पाथर्डी तालुक्‍यातील आठवडे बाजार करंजी व शेवगाव तालुक्‍यातील आठवडे बाजार खानापूर, आव्हाणे बु. व जत्रा प्रभुवडगाव, उपविभागीय दंडाधिकारी श्रीरामपूर भाग- राहुरी तालुक्‍यातील आठवडे बाजार म्हैसगाव, ब्राह्मणी, गुहा, सात्रळ व जत्रा राहुरी बु. दि.29 एप्रिल रोजी शिर्डी लोकसभा मतदार संघ-उपविभागीय दंडाधिकारी श्रीरामपूर भाग- श्रीरामपूर तालुक्‍यातील आठवडे बाजार मालुंजा, टाकळीभान, भोकर व जत्रा फत्याबाद, उपविभागीय दंडाधिकारी संगमनेर भाग- संगमनेर तालुक्‍यात आठवडे बाजार आश्‍वी बु. व जत्रा शेडगाव, पिंपरणे. अकोले तालुक्‍यात आठवडे बाजार राजूर, वीरगाव, केळी, रुह्मणवाडी व उपविभागीय दंडाधिकारी शिर्डी भाग राहाता तालुक्‍यातील आठवडेबाजार पिंप्रीनिर्मळ, पुणतांबा, व कोपरगाव तालुक्‍यातील आठवडे बाजार – कोपरगाव नगरपरिषद हद्द (शहर) वरील दोन्ही लोकसभा मतदानाच्या दिवशी आठवडे बाजार बंद राहणार आहेत व जत्रा पुढे ढकलण्यात आले आहेत, असेही एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.