झेंडूच्या फुलांनी बाजारपेठ बहरली

दसरा पूजनासाठी फुले व आपट्याची पाने खरेदीस गर्दी

कराड – साडेतीन मुहुर्तापैकी एक मानला जाणारा विजयादशमी या मुहुर्ताला पूजनासाठी लागणाऱ्या लाल-पिवळ्या झेंडूच्या फुलांनी कराडची बाजारपेठ सोमवारी चांगलीच बहरली. मंडई परिसरासह शहरातील मुख्य मार्गाच्या कडेला झेंडुची फुले विक्रीसाठी आलेली होती. मंगळवारी होणाऱ्या दसरा पूजनासाठी फुले व आपट्याची पाने खरेदीसाठी ठिकठिकाणी नागरीकांनी एकच गर्दी केली होती.

घटस्थापनेपासून बाजारात तेजी आल्यामुळे झेंडूसह गुलछडी, शेवंती या फुलांना चांगलीच मागणी वाढली आहे. झेंडूची आवक चांगली असून लाल, पिवळ्या झेंडूपेक्षा कोलकत्ता गोंड्याला चांगला भाव आलेला होता. मात्र दसऱ्यासाठी लाल-पिवळ्या झेंडूलाच ग्राहकांकडून पसंती दिली जात असते. घरगुती पूजा, विविध मंदीरातील पूजेसाठी फुलांची मागणी वाढली असून दसऱ्याला घरोघरी शस्त्रपूजन केले जाते. यासाठी लागणारी फुले व आपट्याची पाने यांच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी झाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.