वाई – वाई येथील मराठी विश्वकोशाचे कार्यालय पुणे अथवा मुंबईला हलविण्याची चर्चा वाई शहरात सुरु असून यामध्ये कोणतेही तथ्य नाही, शासन दरबारी याबाबतचा कोणताही निर्णय झाला नसून मराठी विश्वकोश कार्यालय वाईमध्येच राहणार आहे, तरी वाईकर नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, अशी माहिती मराठी विश्वकोश कार्यालयाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर यांनी दिली.
वाई शहरात असणारे मराठी विश्वकोशाचे कार्यालय पुणे अथवा मुंबईला हलविण्यात येणार आहे, अशी चर्चा मराठी भाषा विभागाच्या अधिकाऱ्यांकडुर सुरु आहे. या चर्चेचे शहरात तीव्र पडसाद पहावयास मिळत असून नागरिक तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
दरम्यान, वाईतील हे कार्यालय कुठेही हलविण्याचा प्रस्ताव नसल्याचे विश्वकोशाच्या सहाय्यक सचिवांनी सांगितले आहे. मराठी भाषा प्रगल्भतेसाठी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या संकल्पनेतून आणि माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून वाई येथे विश्वकोश खंडाचे काम 1960 साली सुरु झाले. जागतिक विश्वकोशाच्या धर्तीवर मराठी भाषेत माहितीचा खजिना विश्वकोशाच्या माध्यमातून उभारण्याचा संकल्प आजही सुरु आहे. पूर्वी मुद्रित खंडाच्या माध्यमातून उपलब्ध असणारा विश्वकोश आता एका क्लिकवर गुगल व विश्वकोशाच्या ऍपवर उपलब्ध आहे.
विश्वकोशाचे काम गेली अनेक वर्ष वाईतून सुरु आहे. प्राज्ञपाठ शाळा मंडळाच्या प्रशस्त इमारतीत हे काम सुरु आहे. विश्वकोश कामकाज पाहण्यासाठी, अभ्यासण्यासाठी, विश्वकोशाच्या अद्ययावत ग्रंथालयाचा अनुभव घेण्यासाठी तसेच विश्वकोशाच्या नोंदी अद्ययावत करण्यासाठी अनेक अभ्यागत व विद्वान वाईला येत असतात. सध्याचे असणारे येथील कार्यालय पुणे अथवा मुंबई येथे हलविण्याचा मराठी भाषा विभागात सचिवस्तरावर हालचाली सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
याची चर्चा सुरूवातीला समाज माध्यमातून सुरु झाली. यावर वाई येथील भगवा कठ्ठा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यामुळे वाईकरांच्यात तीव्र नाराजी पसरली आहे. या अनुषंगाने वाईत तीव्र आंदोलन उभारण्यात येणार आहे. या निर्णयात आंदोलन उभारण्यासाठी नागरिक, युवकांनी त्यांच्या स्तरावर बैठका सुरु केल्या आहेत. तसेच वाईकर नागरिकांच्यावतीने तशा आशयाचे लेखी निवेदन प्रशासनाला देण्यात येणार आहे.
मराठी विश्वकोश कार्यालय वाईतून हलविण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. याबाबत गैरसमजातून चुकीची माहिती पसरविण्याचे काम चालू आहे. आपण वाई येथे प्रज्ञापाठशाळा अथवा परिसरात प्रशस्त इमारत तर्कतीर्थ लक्ष्मणशात्री जोशी भवन मराठी विश्वकोश कार्यालय वाई यांच्या नावाने तयार करण्याचा यथार्थ प्रयत्न करतोय आणि काही लोक चुकीची माहिती पसरवत आहेत. शासनाने असा कुठलाही निर्णय घेतला नाही.
डॉ. शामकांत बा. देवरे सहायक सचिव – महाराष्ट्र राज्य म
राठी विश्वकोश निर्मिती मंडळ.