मुंबई – दिग्दर्शक व अभिनेते महेश कोठारे यांच्या कोठारे व्हिजनची नवी मालिका “दख्खनचा राजा ज्योतिबा’ आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच या नव्या मालिकेचं कोल्हापूर चित्रनगरीत चित्रिकरण सुरु होणार असून, काही दिवसांपूर्वीच मालिकेचा भूमिपूजन सोहळा कोल्हापूर मध्ये पार पडला. यावेळी महेश कोठारे, आदिनाथ कोठारे, उर्मिला कोठारे आदी होते उपस्थित होते.
तीन-चार महिन्यांनंतर अटीशर्तींच्या आधारावर पुन्हा एकदा चित्रपटांचे आणि मालिकांचे शूटिंग सुरू झाले आहे. त्यामुळे आता बऱ्याच नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मराठीत जवळपास आठ नव्या मालिका सुरू होत आहेत. दख्खनचा राजा जोतिबाच्या महात्म्यावर आधारित “दख्खनचा राजा जोतिबा’ ही मालिका असणार आहे.
दरम्यान, या मालिकेत मध्यवर्ती भूमिका, अर्थात ज्योतिबा कोण साकारणार याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली होती. नवोदित अभिनेता ‘विशाल निकम’ मालिकेत ज्योतिबाच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी तो ‘सात जलमाच्या गाठी’ या मालिकेत झळकला होता. स्टार प्रवाह वाहिनीवर ‘दख्खनचा राजा जोतिबा’ ही मालिका प्रसारित होणार आहे. कोल्हापूर चित्रनगरीत सलग चार वर्षे या मालिकेचे शुटिंग सुरू राहणार आहे.