पुणे – “सूर्य पाहिलेला माणूस’, “हिमालयाची सावली’, “नटसम्राट’ या नाटकांसह “पिंजरा’, “लावारिस’, “सामना’, “सिंहासन’ या गाजलेल्या आणि अशा अनेक चित्रपटांत आपल्या अजरामर भूमिका साकारणारे, अभिनयाचे “नटसम्राट’ डॉ. श्रीराम लागू यांचे निधन अनेक रंगकर्मींसह रसिकांना चटका लावून गेले आहे. यांसह राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या अभिनयाच्या क्षेत्रात त्यांनी जेवढे नाव कमावले तेवढे त्यांनी साहित्यक्षेत्रातही आपली छाप सोडली होती.
पुस्तके
झाकोळ (पटकथा)
डॉ. श्रीराम लागू यांचे निवडक लेख, मुलाखती, भाषणे इत्यादींचा संग्रह असलेले “रूपवेध’ नावाचे पुस्तक आहे. पुस्तकाला डॉ. पुष्पा भावे यांची प्रदीर्घ प्रस्तावना आहे.
नाटककार आणि नाट्यकर्मी यांची चरित्रे……”लमाण’ हे डॉ. श्रीराम लागू यांचे आत्मचरित्र सन 2004 मध्ये प्रकाशित झाले आहे.
पुरस्कार
फिल्मफेअर पुरस्कार –
1978 – “मुख्य सहायक अभिनेता’ घरोंदा (हिंदी)
1997, कालिदास सन्मान
2006, चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील योगदानाबद्दल मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे जीवनगौरव पुरस्कार.
2010, संगीत नाटक अकादमी फेलोशिप
2012, राजश्री शाहू कला गौरव पुरस्कार